विदर्भ क्रांती न्यूज
मुलचेरा, ८ डिसेंबर २०२२ : तालुक्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या बोलेपल्ली ग्रामपंचायत येथील समाज भवन येथे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली समस्या जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळेस बोलेपल्ली, पुल्लिंगुडम, हेटाळकसा या गावातील गावकरी आणि बचत गटाच्या महिला यांच्या समस्या व स्थानिक पातळीवर गावातील महिला व पुरुषांच्या रोजगाराच्या समस्यावर, शासनाच्या कल्याणकारी योजना मिळण्याच्या आळ येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात या समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते यांनी केले. यावेळी युवा नेते गणेश गारघाटे, सदाशिव आत्राम, वैष्णव ठाकूर, सूर्यकांत चांदेकर, वैशालीताई दुर्गे, वैशालीताई गोरडवार, प्रवीण वाकडे, नरोटे काका, तीम्मा काका तसेच गावकरी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.