अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते गांधीनगर येथे क्रिकेट स्पर्धेेेचे उद्घाटन

60

विदर्भ क्रांती न्यूज

मुलचेरा, ८ डिसेंबर २०२२ : स्थानिक मुलचेरा तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर येथे क्रिकेट स्पर्धचं आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेे. त्यावेळी ते म्हणाले, या खेळाने माणूस स्वतःची प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव उंचावर नेऊ शकतो, खेळ खेळल्याने माणसाच शरीर मजबूत होत, मी आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी असे या प्रत्येक खेळासाठी प्रोत्साहन देत असतो. युवा वर्गासाठी आणि त्यांना मी सहकार्य करत असतो. युवा वर्गाने सामाजिक कार्यात सदैव समोर यावे मी आपल्या सोबत आहो माझ्या कडून मी सर्वोतोपरी सहकार्य करत राहीन असे मत त्यांनी यावेळी दिले. तसेच विजयनगर, लक्ष्मीपुरी, गांधीनगर येथील काली मातेचे दर्शन राजे साहेबानी घेतले आणि तेथील जनतेकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अहेरी इस्टेटचे राजकुमार अवधेश बाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, ग्रामपंचायत सदस्य बादल शाह, कालीनगर सरपंच पावन मंडल, बंगाली आघाडी महामंत्री बिधन वैद्य, पोलीस पाटील नागेन सेन, तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, महामंत्री निखिल हलदार, युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, सनातन सरकार, प्रदीप रॉय, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, मंचरलावार, दिलीप आत्राम, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, उमेश सरकार, अक्षय खिराटकार, गांधीनगर येथील ग्रामस्थ आणि खेळाळू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फुलबॉल स्पर्धेेचे बक्षीस वितरण
गेली सात दिवसापासून सुरू असलेल्या फुलबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यावेळी पहिला क्रमांकाच बक्षीस माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून विवेकानंदपुर टीमला मिळाला तीस हजार रुपये आणि ट्रॉफी, तर दुसरा क्रमांक बक्षीस शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला यांच्याकडून जी पी एल मूलचेरा टीमला वीस हजार रुपये आणि ट्रॉफी, आणि तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्याकडून दहा हजार रुपये आणि ट्रॉफी गोविंदपूर टीमला देण्यात आले. चौथ्या क्रमांकाचं बक्षी दयाल दास यांच्याकडून पाच हजार रुपये आणि ट्रॉफी आनंदग्राम टीमला देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षण गणेश कड,जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला, अहेरी इस्टेट चे राजकुमार अवधेश बाबा, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, ग्रा.प.सदस्य दयाल दास, बादल शाह,संतोष उरेटे, विकास उईके, दिलीप आत्राम, विष्णू रॉय, अपूर्व मुजुमदार, दीपक बिश्वास, प्रकाश दत्ता, निखिल हलदार, संजीव सरकार, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, किशोर मलिक, अक्षय खिराटकार, सजीव हलदार, गावातील नागरिक आणि मोठ्या प्रमाणात फुलबॉल खेळाळू उपस्थित होते.