व्याहाड खुर्द येथे सत्कार, शेतकरी, शेतमजूर, भाजपा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश

355

– पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार व खा. अशोकजी नेते यांची उपस्थितीत

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, ६ डिसेंबर २०२२ : भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने जे. के. पाल जुनिअर सायन्स कॉलेज व्याहाड खुर्द येथे शेतकरी, शेतमजूर कार्यकर्ता व पक्षप्रवेश मेळाव्यात मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यविभाग,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यांचा तालुक्यात आगमनानिमित्याने व पुन्हा एकदा भाऊ मंत्रीपदी विराजमान झाल्याने तसेच देशामध्ये प्रथम महाराष्ट्र मंत्रालयात आय. एस. ओ (I.S.O) नामांकन दर्जा प्राप्त करणारे नामवंत पहिले मंत्री गणल्या जाणारे मा. सुधीरभाऊ एकमेव व्यक्ती आहेत. यासाठी त्यांना स्मृतिचिन्ह व शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांचा सुध्दा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा जि. प. अध्यक्ष मा. श्री. देवरावजी भोंगळे यांनी एकाच दिवशी वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन २६६९ रक्तदाते संकलित करुन रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान जीवनदान, यानुसार राज्यात विक्रम केला. त्याबद्दल त्यांचे सुद्धा याप्रसंगी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल यांनी प्रास्ताविक भाषण करतांना तालुक्याच्या विविध समस्या, सामाजिक घटकांच्या समस्या, शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ता या संदर्भात विविध समस्यांचा, निराकरण करण्यासाठी मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री, वने, सांस्कृती कार्य, मत्स्य विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यांना निदर्शनास आणून दिल्या व तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वसामान्य न्याय मिळवून शेतकरी, शेतमजूर,शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देणारे एकमेव सुधीरभाऊच आहेत. यासाठी त्यांच्या केलेल्या कार्याचे कौतुक केले.तसेच मंचावरील खासदार अशोकजी नेते, प्रा. अतुलजी देशकर, देवरावजी भोंगळे यांच्या सुद्धा कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय, लोकनेते, विकास पुरुष, वने, संस्कृती कार्य, मत्स्यविभाग, तथा पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना व कार्यकर्त्यांना संबोधित करताना भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी व खुर्चीसाठी कधीही काम करीत नसून तर शेवटच्या घटकांपर्यंत सामान्य जनतेला सर्वसाधारण व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत असते. राष्ट्रहित, राष्ट्रप्रेम, यावर विश्वास ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला यासाठी तुमचे स्वागत आहे. तालुक्यातील सर्व कामे व समस्येचे निराकरण अवश्य करण्यात येईल. तुमचे माझे एक नांत आहे. आपला जन्म व कर्म दोन्ही याच जिल्हयात आहे. असा विश्वास देतो. शेतकऱ्यांविषयी आमचे सरकार नेहमी कटीबद्ध आहे.धानाला बोनस आमच्याच सरकारने दिला, असे प्रतिपादन या प्रसंगी केले.
यावेळी सुुधीरभाऊ पुढे बोलताना भोई (ढिवर) समाजाच्या कार्याची दखल घेतली. ह्या समाजाची आर्थिकदृष्ट्या, सामाजिक, राजकीय, दृष्ट्या अतिशय हालाकिची आहे, कष्टमय, मागासलेला समाज आहे. त्यासाठी या समाजाला स्वतंत्र घरकुल योजनेत जास्तीत जास्त समाविष्ट करून लाभ मिळावा यासाठी प्रयत्न राहील.या समाजासाठी विविध योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येईल. असे याप्रसंगी सुधीरभाऊंनी व्यक्त केले.

यावेळी खासदार अशोकजी नेते, अतुलजी देशकर, देवरावजी भोंगळे,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अविनाश पाल, संचालन कृष्णाजी राऊत, आभार गिरीश चिमूरकर यांनी केले. याप्रसंगी मान.ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यविभाग मंत्री,महाराष्ट्र राज्य, या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री. अशोकजी नेते, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष जि. प. चंद्रपूर, संघटन जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा तथा ता. अध्यक्ष अविनाश पाल, माजी बांधकाम सभापती जि. प. संतोषभाऊ तंगडपल्लीवार, नगरसेवक तथा ता. महामंत्री सतीश बोम्मावार, ता. महामंत्री दिलीप ठिकरे, ता. कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद धोटे, माजी जि. प. सदस्या योगीताताई डबले, माजी जि. प. सदस्या मनिषा चिमुरकर, नगरसेविका निलमताई सुरमवार, महिला अध्यक्ष पुष्पाताई शेरकी, माजी सभापती पं. स. छायाताई शेंडे, प्रतिभा बोबाटे, छायाताई चकबंडलवार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, जेष्ठ नेते देवराव सा. मुददमवार, जेष्ठ नेते प्रकाश पा.गड्डमवार, विनोद पा.गड़्डमवार, कृ.उ.बा.स.संचालक सचिनभाऊ तंगडपल्लीवार, माजी उपसभापती पं. स. तुकाराम पा.ठिकरे, माजी उपसभापती पं. स. रविंद्र बोलीवार, ओबिसी मोर्चाचे ता. अध्यक्ष कविंद्र रोहणकर, युवा नेते कीशोर वाकुडकर, अरून पाल, डॉ. कवठे, हरीजी ठाकरे, मुक्तेश्वर थोराक.तसेच अनेक तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.