शिवसेनेने स्नेहमिलनातून वाटला शिवसैनिकांंना प्रेमाचा गोडवा

119

– शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात साजरा

गडचिरोली : तळागळातील शिवसैनिकांंना जोडून शिवसेना तयार झाली. शिवसैनिक पक्षाची ताकद आहे. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांंप्रति जो प्रेमभाव जोपासला हा प्रेमभाव शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमातून जोपासत आपल्या शेकडो शिवसैनिकांंना मिठाईचे वाटप करून प्रेमाचा गोडवा वाटला. स्थानिक चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्समधील कमल केशव सभागृहात शिवसेनेच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमिलन कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले कि, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि परमपूज्य माँं. साहेब मिनाताई ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांंना प्रेमाची वागणूक दिली. शिवसैनिक हा केवळ कार्यकर्ता नसून तो पक्षाचा घटक आहे. हा वसा जोपासून महाराष्ट्रात लाखो शिवसैनिकांंची फ़ौज तयार केली. हा वसा शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी जोपासत राज्यात शिवसैनिकांंच्या बळावर मोठी ताकद निर्माण केली आहे. त्यामुळेच आज राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या रुपात मुख्यमंत्री पाहण्याचे भाग्य शिवसैनिकांंना लाभले आहे. मागील दीड वर्षांंपासून राज्यात कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे राज्यावर आपत्ती निर्माण झाली. या आपत्तीचा सामना शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने धैर्याने करून राज्यातील जनतेला आधार दिला, असेही शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार बोलताना म्हणाले, दिवाळीनिमित्त शिवसेनेच्या वतीनेे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी पाचशेपेक्षा अधिक शिवसैनिकांंना दिवाळी भेट म्हणून मिठाई बॉक्सचे वितरण करण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करून तळागळातील गोरगरीब शिवसैनिकांंना प्रेमाचा गोडवा वाटल्याने शिवसैनिकांंच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. आपली शिवसेनेशी जोडलेली नाळ अतुट ठेवा, असे आवाहन करून अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शिवसैनिकांंना दिवाळीच्या शुभेच्या दिल्या. यानंतर या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांंनी मुंबईहून व्हीडियो कॉलिंगद्वारे उपस्थिती दर्शवून शिवसैनिकांंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी जबाबदारी स्वीकारल्यानंतर तीन वर्षात शिवसेनेची ताकद प्रचंड प्रमाणात वाढली. तळागळातील जनतेला शिवसेनाच आधारवड असल्याचे उमगले आहे. स्नेहमिलनाच्या सोहळयातून शिवसेनेचे कार्य तळागळातील जनतेपर्यंत पोहचवावे. शिवसैनिकांंनी पक्षाच्या हितासाठी गावागावात शिवसैनिकांंची फ़ौज तयार करावी आणि शिवसेनेची ताकद वाढवावी, असे आवाहनही पोतदार यांनी केले. पक्षात गटबाजीला कदापिही थारा दिला जाणार नाही, असा ईशाराही पोतदार यांनी यावेळी दिला. यानंतर शिवसेना सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसैनिक हे शिवसेनेचे बळ असल्याचे सांगून शिवसैनिकांंनी शिवसेनेप्रति असलेला प्रेमभाव कायम ठेवावा आणि आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन केले. या स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजूभाऊ कावळे, शहर प्रमुख रामकिरीत यादव, माजी जिल्हा परिषद सभापती वेणुताई ढवगाये, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, गणेश पीठाले, संदीप भुरसे, गणेश दहेलकर, संदीप अलबंनकर, स्वप्निल खांडरे, राहुल सोरते, निकेश लोहबरे, सचिन निलेकर, किशोर गेडाम, अरुण बारपात्रे, मोतीराम भुरसे, धनेश्वर लोहबरे, जगनजी चापले, दिलीप मडावी, नेपाल लोहबरे, गोपाल पानसे, बापूजी वासेकर, ऋषि जी पिपरे, खेमराज भांडेकर, हरिदास नैताम, केशव पिपरे, स्वप्निल ढोढरे, वासुदेव लटारे, वाल्मिकी भांडेकर, सूरज उईके, बाबूराव लाजुरकर, प्रदीप हजारे, सुरेश कोलते, गौरव गोहने, कैलास आवारी, चरण चौधरी, अरविंद गेडाम, मनोहर ठाकरे, दिलीप दहेलकर, महेश धारने, सुकदेव गेडाम, प्रफुल लोनारे, प्रजात गजबे, रामदास बहायल, हरबा दाजगाये, मोहन कामकर, लालाजी बहायल, बापुजी दाजगाये, यशवंत कुलमेथे, तानबा दाजगाये, पंढरी ठाकरे, सुप्रिय फरकडेे, गणेश ठाकरे, राजू मुळे, नरेंद्र ठाकरे, यशवंत चुधरी, हरिश्चद्र गंडाते, देवेंद्र मुळे, प्रशांत ठाकुर, तुषार बोरकर, बबन आवारी, रंजीत हर्षे, अमन भरणे, रूपेश सिडाम, धनेश्वर बानबले, दिलीप चनेकार, केलाराम मुनघाटे, भगवान चनेकार, अंबादास मुनघाटे यांच्यासह शेेेकडो शिवसैनिक उपस्थित होते.