कुनघाडा येथील राष्ट्रीय बुद्धिबळपटू भाग्यश्री भांडेकर हिचे सत्कार

462

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील रहिवाशी सुरेश पाटील भांडेकर यांची सुपुत्री
भाग्यश्री सुरेश भांडेकर ही पुणे शहरात राहून खूप मेहनत घेऊन बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होऊन महाराष्ट्र राज्य वूमेन बुद्धिबळ स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला व गडचिरोली जिल्हाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा परीक्षा पास केले व राज्य बुद्धिबळ स्पर्धेत पंच परीक्षेत यश मिळवले व पुणे जिल्ह्यात आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. राज्य स्तरावरून आंतर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे व तिने पुणे येथे सराव सुद्धा सुरू केले आहे व विशेष म्हणजे राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षा पास केली आहे. याकरिता गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज कुनघाडा येथील भाग्यश्री भांडेकर हिचे निवासस्थानी भेट देऊन तिचा जाहीर सत्कार केला. दिवाळीनिमित्त पुढील भावी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिले व भाग्यश्री भांडेकर हिचे वडील सुरेश पाटील भांडेकर व आई यांचे कौतुक केले. यावेळी प्रामुख्याने येथील ज्येष्ठ भाजप नेते माजी पंचायत समिती उपसभापती आनंद भांडेकर, भाजप नेते रनछोडदास कलंत्री, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, युवा नेते प्रतीक राठी, लोमेश सातपुते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.