भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी : सिनेट सदस्य चांगदेव फाये यांचे प्रतिपादन

51

– सेवानिवृत्तीपर केवळराम खुणे यांचा सपत्नीक सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भावी पिढी घडविणाऱ्यय शिक्षकांचे कार्य निश्चितपणे प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले.
ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरगाव येथील शिक्षक केवळराम खुणे यांच्या सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक केवळराम खुणे व अर्धागिणी मोहिनी केवळराम खुणे यांचा शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी यांच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बुधरामजी ठलाल तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठित नागरिक उदाराम कवाडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश मानकर, नरेंद्रजी मानकर , योगेश ठलाल, पुरुषोत्तम किरसान ग्रा. पं. सदस्य, मंदाताई कोसरे, अंगणवाडी सेविका संगीता सहारे, रेवता किरसान, जयमलाबाई सहारे, शेवंताबाई मानकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक केवळराम खुणे यांनी शिक्षक म्हणून केलेल्या शासकिय सेवेच्या कार्याचे अनुभव सांगितले. यावेळी उदारामजी कवाडकर, जगदिश मानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक मुख्याध्यापक वटी यांनी केले. कार्यक्रम यस्ववीतेसाठी मुख्याध्यापक वट्टी, शाळा व्यवस्थापनचे समितीचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.