काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेला कुरखेडा येथून सुरुवात

44

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँँग्रेसच्या ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्यदिन ७५ कि. मी. भारत जोडो पदयात्रेचा पहिला टप्पा ९ ऑगस्ट रोजी कुरखेडा ते गेवर्धा पार पडला. कुरखेडा येथे पदयात्रेचा सुभारंभ समारोह पार पडल्यानंतर पदयात्रेला सुरुवात कुरखेडा शहरात फेरी मारुन करण्यांत आली. संपुर्ण पदयात्रा भरपावसात पार पाडण्यात आली. स्री – पुरुष सर्व पावसात पदाधिकाऱ्यांंसह चालत गेले. पदयात्रेत जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, रजनीकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, शामराव चाफले, विश्वजित कोवासे, निताराम कुमरे, मिलींद खोब्रागडे, जीवन पाटील नाट, परसराम टिकले, जयंत हरडे, नंदु नरोटे, ढिवरु मेश्राम, वसंत राऊत, दिवाकर निसार, रमेश चौधरी, प्रभाकर तुलावी, आशाताई तुलावी, नंदेश्वर ताई, ढोमनेताई, कुत्तरमारे ताई, सोयब मस्तान, जावेद भाई तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.