काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा पोहचली शंकरपुरात

62

– गावातून प्रभातफेरी काढून घेतली सभा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने आयोजित आझादी गौरव पदयात्रा शंकरपूर (ता. वडसा) येथे पोहचली. यावेळी गावातून प्रभातफेरी काढून छोटे खाणी सभा पार पडली. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी. जि. प. उपाध्यक्ष जीवन पा. नाट, वडसा ता. अध्यक्ष परशुराम टिकले, कुरखेडा ता. अध्यक्ष जयंत हरडे, राजेंद्र बुलले, नरेंद्र गजपुरे, प्रभाकर तुलावी, मिलिंद खोब्रागडे, गिरीधर तितराम, महादेव कुमरे, श्रीराम दुगा, जावेद शेख, विलास बन्सोड, सरपंच दादाजी वालदे, ग्रा. पं. सदस्य जगदीश शेंदरे, विनायक वाघाडे, चैतनदास चंदनबटवे, बेनिराम उईके, अमृत ठाकरे, प्रल्हाद वाघडे, महादेव बुदे, माजी सरपंच दुर्गाबाई वरखेडे, चंद्रभागा वरखेडे, जिजा मडावी, विश्रांती बुद्धे, पुष्पा कन्नके सह शेकडोंच्या संख्येने महिला, पुरुष व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी पदयात्रेत सहभागी झाले.