महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराष्ट्राचा इतिहास जिवंत केला : आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : समाजक्रांतीची मशाल पेटवून विषमतावादी विचारसरणींच्या विरोधात दंड थोपटुन भारतीय वर्णव्यवस्था समुळ नष्ट करण्याच्या प्रयत्नांसह जोतीबा फुल्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करुन महाराष्ट्राचा इतिहास जिवंत केला, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
देसाईगंज येथील हेटी वार्डात समता बौद्ध महीला समितीच्या वतिने महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रा. दामोधर सिंगाडे, विजय बन्सोड, मारोतराव जांभुळकर, ममता जांभुळकर, रमेश घुटके, सागर वाढई, लक्षमन नागदेवते, अड् जुईली मेश्राम, प्रा. खोब्रागडे यांचेसह गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, देश्यात समता प्रस्थापित करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी यथोचित प्रयत्न केले. महात्मा फुल्यांच्या समाज सुधारनेच्या लढ्याला इतरञ कुठेही तोड नाही समाज समता क्रांतीची मशाल पेटवुन महात्मा फुल्यांनी व साविञीबाई फुल्यांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटले अपमान सहन करुन स्ञी शिक्षणाची चळवळ उभारली अस्पृष्य समाजासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली. शेतकऱ्यांंना हक्क मिळावा यासाठी इंग्रजी शासन व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. अनेक ग्रंथ लिहुन समाज प्रबोधनाचे कार्य केले. एवढेच नव्हे तर ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीतुन स्वराज्याच्या निर्मीतीचा संकल्प उभारला. त्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेवुन रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिव समाधीच्या जिर्णोद्धारासाठी ४० हजार रुपये खर्च करुन देश्यात पहिल्यांदा छञपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करुन महाराष्ट्राचा इतिहास जिवंत केला अश्या सर्व थोर महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी स्थानिक आमदार निधीतून १० लक्ष रुपये निधीची वास्तु तयार करण्याचे आश्वासनासह बौद्ध विहार बांधकामाकरिता जागा दान देणाऱ्या ताराबाई गजभिये यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन मान्यवरांच्या उपस्थितीत आ. गजबे यांनी सत्कार केला.