प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयावर शिवसेनेचा ‘हल्लाबोल’

104

– मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची समस्या

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांचा आंदोलनात सहभाग

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यावरून मार्गक्रमण करताना या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करून सुस्तावलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात १५ मार्च रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले.
कॉम्प्लेक्स परिसरातील विश्रामगृह परिसरात शेकडो शिवसैनिक गोळा झाल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयावर धडक देण्यात आली. जय भवानी – जय शिवाजी, मौशीखांब – मुरमाडी जि. प. क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती झालीच पाहिजे, शिवसेना प्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणानि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्याल्याचा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. शिवसैनिकांच्या आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. एन. आर. चिंतावार यांना मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्याची समस्या अवगत करून देण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ग्रामीण भागाच्या रस्ते विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात न आल्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. शिवसेनेचे प्रखर आंदोलन पाहून प्रधानमंत्री ग्रामसडक योजन कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री. एन. आर. चिंतावार यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलनाचे प्रमुख शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील दिभना – अमिर्झा – मुरमाडी, उसेगाव – गिलगाव, आंबेशिवणी – भिकारमोशी, मौशीचक – कातखेडा, मौशीखांब – मौशीचक या पाच रस्त्यांची गेल्या काही वर्षापासून दुरावस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावर अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले असून दुचाकी चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाच्या अभियंत्यांकडे केली.
तसेच मोहटोला ते नीमगांव रस्त्यावर मोठा पुल नसल्याने पावसाळयात या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदर रस्त्यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे प्रखर आंदोलन पाहून प्रधानमंत्री ग्रामसडक योजन कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री. एन. आर. चिंतावार यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलनाचे प्रमुख शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. रस्ते दुरूस्तीच्या मागण्या तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन अभियंता श्रीं. एन. आर. चिंतावार यांनी दिले. येत्या महिनाभरात मौशीखांब मुरमाडी जि. प. क्षेत्रातील रस्ते दुुस्स्तीची कामे मंजूर न झाल्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना बाहेर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आंदोलनाप्रसंगी दिला. याप्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, संदीप भुरसे, गणेश दहलाकर, रविंद्र ठाकरे, हिवराज उन्दिरवाड़े, विठ्ठल उन्दिरवाड़े, शांताराम टेम्भूर्ण, केशव मड़ावी, हरिदास सहारे, पंढरी ठाकरे, सोमा ठाकरे, लक्ष्मण निकुरे, लोकचंद ढोने, साहिल निकुरे, दीपक ठाकरे, सचिन निलेकर, अमोल कुमरे, अशोक धनबोले, चुनाराम मुनघाते, हरिदास झरकर, प्रकाश अलबोले, रेमजी मुनघाटे, भजन गेडाम, यशवंत लकुड़वाहे, संदीप ठाकरे, संजय चांग, लालाजी धनकोल्हे, डंबाजी घरमोड़े, दीपक नंनवारे, अनिल दोड़के, मुकरु दोड़के, रमेश कन्नक्के, मनोज मड़ावी, प्रकाश चौधरी, नरेंद्र धारने, विजय जवाड़े, बंडू गेडाम, रमेश टेम्भूर्ण, रवि कुमरे, यशवंत लकुड़वाहे, मनोहर ठोम्बरे, प्रकाश मड़ावी, भाष्कर लोहबरे, युवराज कुलमेठे, घनशाम दोड़के, विष्णु वासेकर, संजय उसेंडी, अनिल आलम, पंकज पिपरे, विनोद तिजारे यांच्यासह मौशिखांब- मुरमाडी परिसरातील शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.