गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे कधी भरणार : आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा राज्य सरकारला प्रश्न

126

– विधानसभेत लक्षवेधी प्रश्नोतरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे उपस्थित केला प्रश्न

– सुगम दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्या, डोंगरी भागातील रिक्त असणारे पद तसेच पेसांतर्गत रिक्त पदांबाबत मांडला मुद्दा

गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदांची पूर्तता लवकरच करण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पद रिक्त असल्याने विकासकामात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सदर रिक्त पद कधी भरण्यात येतील, असा प्रश्न गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी लक्षवेधीच्या प्रश्नोतरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केला.

यावेळी बोलताना आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य रिक्त पदे अजून पर्यंत ही भरण्यात आलेले नाही . सुगम-दुर्गम भागातील अनेक शिक्षकांच्या बदल्या देखील मागील काही वर्षांपासून थांबलेल्या आहेत. पेसांतर्गत भरावयाची पदे सुद्धा अजून पर्यंत भरण्यात आलेली नाही. डोंगराळ भागातील आजही असंख्य पद रिक्त आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच विभागांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये प्रचंड अडथळा येत असून अनेक विकासात्मक कामे रखडलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ह्या रिक्त पदांची पूर्तता कधी करणार, असा प्रश्न आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना या लक्षवेधी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला. यावेळी मंत्री महोदयांनी गडचिरोलीकडे विशेष लक्ष देऊन शिक्षकांची पदे भरण्यासंदर्भात आपण शिक्षणमंत्री यांचेशी चर्चा करून निर्णय घेवू तसेच पेसा अंतर्गत रिक्त पदे, डोंगरी भागातील रिक्त पदांबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी विधानसभेत आमदार महोदयांना दिले.