नव्या विश्व व्यवस्थेत भारताला महत्त्वाचे स्थान : डॉ. शैलेन्द्र देवळाणकर

82

– नमाद महाविद्यालयात ‘बदलती विश्व व्यवस्था’ विषयावर संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया (प्रतिनिधी) : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविधालय गोंदिया आणि सेठ नर्सिंगदास मोर कला, वाणिज्य आणि श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालय तुमसर यांच्या राज्यशास्त्र विभागाच्या सयुंक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘संवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘बदलती विश्व व्यवस्था’ या विषयावर आभासी पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शासकीय विदर्भ ज्ञान – विज्ञान संस्था अमरावतीचे प्राध्यापक तथा आंतरराष्ट्रीय घडामोडीचे प्रसिद्ध विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘बदलती विश्व व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन केले.

गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बदलती विश्व व्यवस्था या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, नव्या बदलत्या विश्व व्यवस्थेत भारताला महत्वाचे स्थान आहे. रशिया – युक्रेन युद्धात भारताने स्वीकारलेली भूमिका ही अतिशय योग्य असून या भूमिकेमुळे भारताचे महत्व विश्व व्यवस्थेत वाढण्यास मदत होणार आहे, असे डॉ. देवळाणकर यांनी सांगितले. डॉ. देवळाणकर यांनी दीर्घ संबोधनात बदलत्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत डॉ. देवळाणकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी नमाद महाविध्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन,  एस. एन. मोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन वेरुळकर यांनी प्रमुख मार्गदर्शक डॉ. देवळाणकर यांचा परिचय करून दिला.  डॉ. शशिकांत चवरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. किशोर वासनिक यांनी कार्यक्रमाचे संचालन तर डॉ. एच. पी. पारधी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीतील डॉ. राजेंद्र बेलोकार, डॉ.अंबादास बाकरे, डॉ. मुनेश ठाकरे, डॉ. नरेश भुरे (तांत्रिक सहाय्य) यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक आभासी पद्धतीने उपस्थित होते.