विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मुंबई येथे सुरू असलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होऊन आरमोरी मतदारसंघातील वृद्ध कलावंतांचे मंजूर झालेले मानधन जमा करण्यात यावे, मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्याचे अनुदान देण्यात यावे, जुन २०२४ मध्ये वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील नदी काठावरील वाहुन गेलेली शेती व पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी, मतदार संघातील मोहरा प्रजातीच्या धान पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नापिकीची नुकसान भरपाई देण्यात यावी, मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेली रस्ते व पुलाची कामे अपुऱ्या निधीमुळे बंद पडलेली असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे याकरिता विभागाने मागणी केल्याप्रमाणे आवश्यक निधी उपलब्ध करण्यात यावा. यासह महायुती शासनाने शेतकरी, महिला, युवक व गरीब कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले.







