– गुणवत्ता वाढली : १५ प्राविण्य तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या ३६ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणी व २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
स्नेहा सुरेश तुमरेटी ही विद्यार्थिनी ८५.८० टक्के गुण घेऊन प्रथम आली. शशिकला देवराव उसेंडी ही ८३.४० टक्के गुण घेऊन द्वितीय तर ममिता देवसू मडावी ही ८१ टक्के गुण घेऊन तृतीय आली. या शाळेचा बारावी कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला हे देखील येथे उल्लेखनीय आहे. बारावीमध्ये मोनिका मधुकर मडावी हिने ७५.१७ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविले. स्नेहा नरेंद्र मेश्राम ही ७१. १७ टक्के गुण घेऊन द्वितीय तर वैष्णवी जीवन मंटकवार ही ७०.१७ टक्के गुण घेऊन तृतीय आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विष्णू चव्हाण, शिक्षक सुधीर शेंडे, सी. डी. नळे, एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, व्ही. एस. देसू, वर्षा मस्के, चंदा कोरचा, व्ही. एम. नैताम, रविकांत पिपरे, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, अभय कांबळे, करिश्मा गोवर्धन व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.






