विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येथील इंदिरानगर येथे २३ मे २०२४ रोजी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर यांच्या वतीने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला इंदिरानगर येथील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलीत करून व प्रतिमांना मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आयुष्यमती आशा पाटील व आयुष्यमती स्नेहा मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगरचे अध्यक्ष सतीश भानारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पाटील, शेषराव तुरे, आशीष घोनमोडे, रविंद्र उराडे, अरविंद साखरे, अनमोल मेश्राम, शिवकुमार मेश्राम, मनोहर बारसागडे, सुरेश खोब्रागडे, धनराज करवाडे, बंडू खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सचिन पाटील यांनी भगवान बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर मागदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री नंदेश्वर यांनी केले. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रमाई महिला मंडळातर्फे बुध्दवंदना घेण्यात आली व आयु. सचिन पाटील व आशा पाटील यांनी खिर दान केले.
कार्यक्रमाचे आयोजन तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर व रमाई महिला मंडळ इंदिरानगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.







