– पोर्ला व धुंडेशिवणी परिसरात ४० कोटी रुपयांच्या कामांचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पंचायत समिती पोर्ला व धुंडेशिवणी परिसरात आमदार विकास निधी, रोजगार हमी योजना, बजेट, जिल्हा वार्षिक योजना, २५-१५, जन सुविधेची कामे, खणीकर्म, पाणीपुरवठा शाळा बांधकामासह अन्य विकास निधी योजनेअंतर्गत ४० कोटी रुपयांच्या विकास कामांचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भूमिपूजन व लोकार्पण केले. या परिसराच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. विकासाचा झंजावात असाच सुरू राहणार, असे प्रतिपादन या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, सरपंच निवृत्ती राऊत, भाजप नेते लोमेश कोलते, अशोक चापले, पंकज खेवले, संतोष दशमुखे, मनोज किरमिरे, पांडुरंग भोयर, पांडुजी सूर्यवंशी, भास्कर मेश्राम, विवेक भोयर, ईश्वर राऊत, बाबूभाऊ फरांदे यांच्यासह स्थानिक गावकरी उपस्थित होते.







