रायुकाँचा ‘युवा संवाद वेध भविष्याचा’ एक दिवसीय शिबिर

75

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीतर्फे ‘युवा संवाद वेध भविष्याचा’ एक दिवसीय विचार मंथन शिबिर सोमवार, 4 मार्चला 2024 सकाळी 10.30 वाजता सुमानंद सभागृह येथे होणार आहे.

आगामी लोकसभा/विधानसभा निवडणुकीत युवक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करुन प्रचार सोशल मिडीयाच्या माध्यमातून युवकांत संगठन बांधणीकरिता प्रदेश पातळीवरून मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते पार्थ दादा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण, कार्याध्यक्ष निखिल दादा ठाकरे, राकाँ जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी बांधकाम सभापती नाना नाकाडे, राकाँ सरचिटणीस संग्राम कोते पाटील, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर), रायुकॉ निरीक्षक डॉ. अहेफाज देशमुख, महिला राकॉ. विभागीय अध्यक्षा शाहिन हकीम, राकॉ. सरचिटणीस ऋषिकांत पापडकर, राकॉ. सरचिटणीस युनुस शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच युवती व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी पत्रकातून केली आहे.