शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दणक्याने मरेगाव बस सुरू

79

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब – मुरमाडी जि. प. क्षेत्रातील मरेगाव व परिसरात बस सेवा सुरू करण्याबाबत शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक व नागरिकांनी आगार प्रमुखांना भेटून विद्यार्थी व नागरिकांच्या समस्याकडे लक्ष वेधले होते.

आगार प्रमुखांनी मागणीची दखल घेऊन मरेगाव व परिसरातील गावात 15 जानेवारी 2024 पासून नियमित बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे मरेगाव व परिसरातील शाळेकरी विद्यार्थी व प्रवाश्यांना दिलासा मिळाला असून पुढाकार घेऊन बस सेवा सुरू करण्यास महामंडळाचे लक्ष वेधल्याबद्दल शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार याचे मरेगाव येथील नागरिकांनी आभार मानले आहे.