विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, जिल्हा परिषद गडचिरोली येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी विश्वनाथ विठ्ठलराव दुधबळे हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सेवेला याच कार्यालयातून सुरुवात करून याच ठिकाणी आपल्या कार्याचा समारोप केला.
त्यांच्या सन्मानार्थ गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर सेवक संघटनेच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी भूषविले. यावेळी अधीक्षक (वेतन पथक) विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम, संघटनेचे अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दुधबळे यांच्या दीर्घ व प्रामाणिक सेवेला उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कामातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि सहकाऱ्यांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध यांची सर्वांनी प्रशंसा केली. यावेळी कार्यालयातील कर्मचारीवृंद तसेच शिक्षकेत्तर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दुधबळे यांना निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारंभास हेमंत रामटेके, भूपेश वैरागडे, अभिषेक शिवणकर, राजू मुंगेलवार, राकेश हेडाऊ, लाडवे, अरुण धोडरे आदी उपस्थित होते.







