नमो चषकाबाबत खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात प्रा. अतुल देशकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक

52

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची नमो चषकासंबंधी नियोजनात्मक पदाधिकाऱ्यांची बैठक गोसेखुर्द रेस्ट हाऊस ब्रह्मपुरी येथे खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात माजी आमदार तथा विधानसभा प्रमुख प्रा. अतुलजी देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

नमो चषकाच्या नियोजन बैठकी दरम्यान खासदार अशोकजी नेते यांनी बोलताना नमो चषक हा युवकांचा उत्साह द्विगुणी वाढविण्यासाठी व युवकांच्या शारीरिक श्रमाच्या विकासासाठी बौद्धिक विकासाबरोबरचं युवकांचे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे. यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. यासाठी युवकांनी खेळ खेळावे याकरिता नमो चषकाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन या बैठकी दरम्यान खासदार अशोक नेते यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना केले.

याप्रसंगी भाजपा शहर महामंत्री मनोज भोपाल यांचा वाढदिवस साजरा करित खासदार महोदय व अतुलजी देशकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रामुख्याने खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, माजी आमदार तथा विधानसभा प्रमुख प्रा. अतुलजी देशकर, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, विधानसभा विस्तारक कादर शेख, प्राचार्य अरुण शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, माजी जि. प. सभापती नागराज गेडाम, सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, ब्राह्मपुरी तालुका महामंत्री तथा नगरसेवक मनोज वटे, महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार, माजी सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, सिंदेवाही शहर अध्यक्ष राजू पुसतोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे, शहर अध्यक्ष ब्रह्मपुरी अरविंद नंदुरकर, भाजपा शहर महामंत्री मनोज भोपाल, जिल्हा सचिव तथा नमो चषक ब्रह्मपुरी विधानसभा संयोजक तनय देशकर, साकेत भानरकर, कृषी उत्पन्न भाजर समिती संचालक यशवंत आंबोरकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव पूनेश गंडलेवार, किशोर वाकुडकर, जितु सोनटक्के, आशिष चिंतलवार, सालोटकर, देवा मंडलवार, अविनाश मस्के, धीरज पाल, रितेश दशमवार, पवन जयस्वाल आदी उपस्थित होते.