खा. अशोक नेते यांची आष्टी येथील प्रभू श्रीराम मंदिर देवस्थानाला सदिच्छा भेट

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी या शहरातील नावाजलेले भव्य सुसज्य असे प्रभू श्रीराम मंदिर देवस्थान आहे. प्रभू रामांप्रती येथे भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे. खासदार अशोक नेते हे आष्टीवरून अहेरी येथे दौऱ्याप्रसंगी जात असताना या देवस्थानच्या मंडळांच्या व्यक्तीने फोन केला. या भावनेखातर आष्टी येथे खासदार अशोक नेते यांनी प्रभू श्रीराम मंदिर देवस्थानाला सदिच्छा भेट दिली. यावेळी या मंदिरातील प्रभू राम, सीता व लक्ष्मण या मूर्तीचे दर्शन घेत पूजा अर्चना करत नतमस्त झाले. याप्रसंगी देवस्थानच्या मंडळांनी खासदार अशोकजी नेते यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छाने स्वागत केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान खासदार अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, आपण मला या ठिकाणी बोलावलं अतिशय आनंद झाला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी मंदिर स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपणही मंदिर स्वच्छता अभियान करावे व येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्याने आपण दिवाळी सारखा सण साजरा करावा. प्रत्येकांनी आपल्याला घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा.यावेळी देवस्थान मंदिराच्या अडीअडचणी समस्या जाणून घेत आपल्या समस्यांचे निराकरण नक्कीच होईल, अशी ग्वाही देत आपल्या भावना खासदार महोदयांनी व्यक्त केल्या.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जिल्हा उपाध्यक्ष तथा चपराळा प्रशांतधामचे अध्यक्ष संजय पंदिलवार, अनिल अल्लुरवार, राजू चन्ने, पप्पु सेठ, रविन्द्र आगरकर, दतु श्रीपुरवार, प्रभूदास खोब्रागडे, पुषवाजी, पराग गोनपल्लीवार, विठ्ठल आवारी, अनिल बोमकंटीवार, सत्यनारायण चेबळवार, नितीन बहीरवार व भाविक भक्त उपस्थित होते.