विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : केंद्र विसोरा यांच्यावतीने केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन १८ ते १९ जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी (ता. देसाईगंज) येथे आयोजित करण्यात आले होते. या केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती नानाभाऊ नाकाडे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती देसाईगंजचे माजी उपसभापती गोपालजी उईके, कसारीचे सरपंच प्रदीपजी मडावी, उपसरपंच रवी काशीवार, शंकरपूरचे उपसरपंच दादाजी वालदे, कसारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कन्नाके, बोळधा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पितांबर गायकवाड, विलासजी बनसोड, गुरुदेवजी सिडाम, मनोहर शेंडे, नंदकिशोरजी झोडे, अंजिराताई वैद्य, छायाताई गायकवाड, दुधराममजी मडावी, जांभुळकर, जगदीश शेंद्रे, केंद्रप्रमुख एकनाथ पिलारे, सुरेश संग्रामे, दिलीप मेश्राम, धनपाल मिसार, पुष्पाताई आळे, सुरेखाताई बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला केंद्रातील सर्व शाळा मुख्याध्यापक, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष गण, सर्व सदस्य गण, विद्यार्थी, विद्यार्थिनी व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







