– सहा विधानसभा क्षेत्रातील विजयी कबड्डी चमू व स्थानिक चमूचा सहभाग
– खासदार अशोक नेते यांचा पुढाकार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने चामोर्शी येथील संताजी क्रीडांगण येथे जय बजरंग युवा मंडळ (गोंडपुरा) चामोर्शी जिल्हा गडचिरोलीद्वारा चामोर्शी शहरात 23 जानेवारीपासून प्रथमच गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठे खासदार नमो चषक प्रो कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेकरिता प्रवेश फी तीन हजार रुपये व आक्षेप फी सहा हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचे प्रथम बक्षीस एक लाख 11 हजार 111 रुपये व द्वितीय बक्षीस 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आले आहे. या आयोजित स्पर्धेत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली विधानसभा, अहेरी विधानसभा, बल्लारपूर विधानसभा, ब्रह्मपुरी विधानसभा, आरमोरी विधानसभा, चिमूर विधानसभा व आमगाव विधानसभा क्षेत्रातील कबड्डी स्पर्धेत विजय झालेले सर्व विजयी चमु सहभाग घेणार आहेत. तसेच सदर स्पर्धा खुली असल्याने या स्पर्धेत प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील व विदर्भातील विविध जिल्ह्यातून कबड्डीपटू सहभाग घेणार आहेत. सदर कबड्डी स्पर्धा रात्रकालीन असल्याने मैदानावर हायमास्ट लावण्याचे काम सुरू आहे. तसेच सदर संपूर्ण स्पर्धा एलईडी स्क्रीनवर व व्हाट्सअप फेसबुक ट्विटर आणि टीव्ही चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे चामुर्शी शहरात या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जय बजरंग युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आशिष पिपरे यांनी सांगितले
या स्पर्धेच्या निमित्ताने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील 5000 नव युवकांची नोंदणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत लाखो रुपयाच्या प्रोत्साहनपर बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील तमाम कबड्डीपटू यांनी सहर्ष सहभाग घ्यावा व ठेवण्यात आलेली बक्षिसे विजय मिळवून मान्यवरांच्या हस्ते प्राप्त करावे, असे आवाहन केले. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धेचे संयोजक खासदार अशोकजी नेते यांचे चामोर्शी जनसंपर्क कार्यालय प्रमुख रमेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.







