Home गडचिरोली अजय कंकडालवार यांची घटनास्थळाला दिली भेट

अजय कंकडालवार यांची घटनास्थळाला दिली भेट

125

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील कापसाच्या शेतात काम करत असताना वाघाच्या हल्यात मृतक सुषमा देवदास मंडल यांची जागीच ठार झाले आहे. प्राप्त माहितीनुसार सदर महिला मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील 30 ते 35 वर्षीपासून अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे स्थायी झाली आहे. त्यांच्या घरी एक किराणा दुकान असून चिंतलपेठ गावात त्यांची शेती पण आहे. सुषमा देवदास मंडल यांनी सकाळी शेतात कापूस वेचणी करताना अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केला. वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार झाली. मंडल परिवारावार दुःखाचे डोंगर कोसळले आहे.ही माहिती स्थानिक आविसं – काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच अजयभाऊ कंकडाळलवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी असलेल्या नागरिक आणि त्यांचे नातेवाईकांनी 10 मिनिटापूर्वी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले म्हणून सांगितल्याने माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार तिथून लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते जाऊन मंडल परिवारातील नातेवाईकांची भेट घेतली. फ़ॉरेस्ट विभागाचे अधिकारी उपवनक्षक साहेबांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साघून नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करण्याची विनंती केली.

यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली हनमंतूजी मडावी, अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर, स्वप्नील मडावी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगरसेवक, स्वप्नील मडावी, प्रमोद गोडसेलवार, सचिन भाऊ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!