Home गडचिरोली घारगाव येथे भेंडाळा परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

घारगाव येथे भेंडाळा परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

127

– काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट करण्याची गरज

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बूथ जोडणीकडे बारकाईने लक्ष देऊन काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेवजी किरसान यांनी केले.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षांनी भेंडाळा परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घारगाव येथे 7 जानेवारी 2024 रोजी आयोजित केली होती. त्याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले. सदर सभेत ग्राम काँग्रेस कमिट्या व बूथ कमिट्या बळकटीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!