Home गडचिरोली राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

92

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे ६ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान ६९ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा पुरुष व महिला २०२३-२४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या स्पर्धेचे उद्घाटन रविवार, ७ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभाचे अध्यक्ष शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली डॉ. सचिन मडावी, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया महासचिव वाय. राजाराम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर भरडकर, महाराष्ट्र दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष डॉ. पि. के. पोटाला, कार्याध्यक्ष डी. एस. गोसावी, महासचिव अतुल इंगळे, क्रीडा विभाग संचालक डॉ. सुरज येओतिकर, जिजामाता पुरस्कार प्राप्त डॉ. दर्शना येवतीकर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राजेंद्र भांडारकर, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख पदाधिकारी युनूस शेख आवर्जून उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात धर्मरावबाबा आत्राम यांनी सर्वप्रथम भारतातून आलेल्या ३० पुरुष २४ महिला संघातील खेळाडू प्रशिक्षण व्यवस्थापक यांच्या अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रात बॉल बॅडमिंटन खेळाला ५ टक्के आरक्षणात समावेश करून संघटनेच्या अडचणी सोडून पुन्हा गत वैभव मिळवून देण्याचे आश्वासन उपस्थित खेळाडूंना दिले.

याप्रसंगी समस्त राज्याच्या संघाने गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या बँड सोबत सुंदर पथसंचालन करून सर्व क्रीडारसिकांचे लक्ष वेधले. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या खेळाडू आशिष निजाम यांनी मशाल घेऊन मैदानाला वंदन केले. तसेच या स्पर्धेला यशस्वी आयोजनासाठी धर्मरावबाबा आत्राम यांनी आयोजन समिती अध्यक्ष रशिकांत पापळकर, सचिव अतुल इंगळे, बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडकिलचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, प्रा. रूपाली पापडकर, आशिष निजाम, कपिल बागडे, प्रशांत मशाखेत्री, प्रवीण पोयाम, संजय मानकर इत्यादींचे विशेष कौतुक केले. उद्घाटन समारंभाचे संचालन डॉ. श्रीराम पवार ठाणे व रमण गागापुरवार, प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पि. के. पटेल तर आभार राजेंद्र भंडारकर यांनी मानले.

error: Content is protected !!