Home गडचिरोली मार्कंडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा काढणार : आमदार डॉ....

मार्कंडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा काढणार : आमदार डॉ. देवराव होळी

118

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता सोमवार, दि. ८ जानेवारीपासून आपण विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करणार असल्याची माहिती गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या महामृत्युंजय मार्कंडेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या १७ महत्वपूर्ण योजनांची माहिती, त्याच्या लाभापासून किती नागरिक वेगवेगळ्या कारणांनी वंचित राहिले आहेत. त्याची कारणमीमांसा व तात्काळ सोडवणूकीचे प्रयत्न करणार असून यासाठी प्रशासनाशी थेट संवाद साधणार आहे. राज्य सरकारच्या ११ महत्वाकांक्षी योजनांच्या संदर्भात नागरिकांशी संपर्क व चर्चा करणे, महिला सशक्तीकरण अभियान लोकांपर्यंत पोहोचवणे असे यात्रेचे स्वरूप आहे. या दरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत आणि पंचायत समितीमध्ये आढावा घेण्यासाठी दोन तास अधिकाऱ्यांसमवेत बैठक करणार आहे. यातून शासनाच्या योजनांच्या लाभार्थी आणि वंचित यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी सांगितले आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे आणि शेतकरी नेते रमेश भुरसे उपस्थित होते.

error: Content is protected !!