Home गडचिरोली अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

103

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील नारानूर व रेंगावाही येथील जय महादाखंडी क्रीडा मंडळ नारानूर/रेंगावाही यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून प्रथम पुरस्कार देण्यात येत आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांचे गावात आगमन होताच नागरिकांनी आदिवासी रेला नूत्य करत ढोलताशाने जंगी स्वागत केले. कंकडालवार यांनी प्रथम सप्तरंगी ध्वजाचा ध्वजारोहन करून आदिवासीचे जननायक बिरसा मुंडा आणि स्त्री शिक्षणाचे जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

या स्पर्धेचे उद्घाटन आविसं – काँग्रेसचे नेते, माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी. मडावी व आविसं तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी होते. सहउद्घाटक म्हणून आविस तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार व ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरागडे होते. यावेळी उपस्थित मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, स्वप्नील मडावी, चिंटू आत्रामसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!