नरभक्षक वाघाला जेरबंद करा ; खा. अशोक नेते यांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश

71

– वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांचे खा. अशोक नेते यांच्याकडून सांत्वन भेट व आर्थिक मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुक्यातील गोविंदपुर येथील स्व. माया धर्माजी सातपुते (५५ वर्ष) ही महिला १५ डिसेंबर २०२३ ला दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान सरपण गोळा करण्यासंबंधित शेतशिवारात गावाच्या जवळपास काम करित असताना अचानकपणे वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

गावकऱ्यांनी जंगलात किंवा शेतावर जाताना एकटेच न जाता टोळीनेे जावे. हातात काठी घेऊन आपली खबरदारी घेत गावकऱ्यांनी शेतावर व जंगलात जावे.व आपली सावधगिरी बाळगावी, अशा सुचनाही याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.

सदर घटनेची माहिती खासदार अशोक नेते यांना मिळताच लगेचच त्यांनी ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेऊन आर्थिक मदत दिली.

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, तालुकाध्यक्ष विलास पा. भाडेकर, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिशदत्त्त शर्मा, महिला आघाडी जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, से. नि. उपनिरिक्षक कान्होजी लोहबंरे, उपसरपंच प्रितम गेडाम, रवी मोहुरले, किसन गेडाम, शंकर मेश्राम, प्रकाश नैताम, विलास पिपरे, लोमेश कोहळे, तसेच मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी आणि वन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.