वाघ आणि रानटी हत्ती बंदोबस्ताबाबत वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

59

– आमदार कृष्णाजी गजबे यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर : आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्हा मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्याने वाघ व इतर हिंस्र पशुंचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढलेला आहे. यासोबतच ओडीसा राज्यातुन आलेल्या रानटी हत्तींचा सुद्धा धुमाकूळ वाढलेला आहे. त्यामुळे शेतशिवार शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले होऊन जिवीतहानी होत आहे. रानटी हत्ती मुळे शेतपिक, फळझाडे, भाजीपाला, शेतातील शेती औजारे, गोठे, गोदामात साठवून ठेवलेले धान, गावातील घरांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक दहशतीत असुन त्यांना आर्थिक नुकसान होत असल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत आमदार कृष्णा गजबे यांनी मतदार संघातील समस्या उपस्थित केल्या त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत हत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत २५ हजारांहून ५० हजार वाढ करणे. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेत निवड असलेल्या ५२ वना लगतच्या गावातील शेत्यांना चेनलींग फेसिंग कुंपण घालून वन्यप्राण्यांना प्रतिबंध घालने. यासह उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावर मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला आमदार कृष्णा गजबे यांच्यासह आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. नामदेवराव किरसान, छगन शेडमाके व जिल्ह्यातुन अनेक मान्यवर उपस्थित होते.