जिल्ह्यातील रॉइस मिलर्सनाच मिलिंगची संधी द्या

52

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

– आदिवासी विकास महामंडळ व फेडरेशनचे धान व तांदूळ ठेवण्यासाठी गोडाऊन बांधकाम करण्याची केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ व फेडरेशनच्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची मिलिंग करताना गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलर्सना संधी देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेत झालेल्या चर्चेमध्ये केली.

यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व फेडरेशनच्या मार्फतीने खरेदी करण्यात येणारे धान उघड्यावर ठेवत असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्याची नासाडी होते. त्यामुळे या ठिकाणी धान ठेवण्यासाठी तसेच तांदूळ ठेवण्यासाठी गोडाऊन निर्मितीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याकरिता गोडाऊन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.