महिला सक्षमीकरण ही काळाची गरज : योगीताताई पिपरे

55

– मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत व समाजकल्याण विभाग व दिअंओ-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

– नगर परिषद गडचिरोली यांच्या वतीने इंदिरानगर येथे भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बहुतांशी महिला विविध क्षेत्रात कार्यरत राहून रोजगार मिळवित असल्याने त्या अर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. परंतु शहरी भागातील बरेचशा महिलांकडे व ग्रामीण भागातील महिलांकडे विविध क्षेत्रांत काम करण्याची क्षमता असतानाही त्यांना समाजाकडून योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याने त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. या महिलांसाठी मा. पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांतून तसेच बचतगटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे व देत आहेत. महिलांनी या योजनांचा लाभ घेतला तर निश्चितच त्यांचा अर्थिक स्तर उंचावून सक्षमीकरण होईल. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत व समाजकल्याण विभाग व दिअंओ-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद गडचिरोली यांच्या वतीने भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगर येथील नप प्राथ. शाळा जवळील खुल्या आवारात करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून योगीताताई पिपरे बोलत होत्या.

महात्मा ज्योतीराव फुले जन धन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना गोल्डन कार्डचे वाटप, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, केंद्र शासन सहाय्यित योजना, महाआरोग्य शिबीर, कृषी चिकित्सालय, हत्तीरोग अभियान, पोस्ट ऑफिस, बँकऑफ इंडिया खाते उघडणे अशा ईतरही विविध शासकीय योजना विषयी माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.

याप्रसंगी पंतप्रधान आवास योजनांचे चेक, प्रधानमंत्री स्वनिधी योजनांचे चेक व मंजूर पत्र योगीताताई पिपरे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, न. प. चे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी नप सभापती केशव निबोड, माजी नगरसेविका लताताई लाटकर, माजी नगरसेविका बेबीताई चिचघरे, उप मुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र मुरमुरवार तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र सोनवाने व सूर्यकांत मडावी यांनी केले.