डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते मनाली शिवणकला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

71

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मनाली बहूउद्देशिय शिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने मनाली शिवणकला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हसन गिलानी, जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, गडचिरोली काँग्रेसचे शहर अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, काँग्रेसच्या गडचिरोली तालुकाध्यक्षा तथा संस्थाध्यक्षा कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम आदींची उपस्थिती होती.

गडचिरोली शहरातील मुली व महिलांना स्वयंरोजगार करता यावं यासाठी अशा प्रशिक्षण केंद्राची आज गरज आहे. या शिवणकला प्रशिक्षण केंद्राच्या मध्येमातून अनुभवी व उत्तम महिला प्रशिक्षक सर्व प्रकारचे महिलांचे कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्याचा असून प्रशिक्षण पूर्णझाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. गडचिरोली येथील मुली व महिलांनी या शिवणकला प्रशिक्षणमध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण घ्यावे, असे मार्गदर्शन डॉ. उसेंडी यांनी यावेळी महिला भगिनींना केले.