Home गडचिरोली शिवसेना (उबाठा) चे शिवसैनिक गडचिरोली वनसंरक्षक कार्यालयावर धडकले

शिवसेना (उबाठा) चे शिवसैनिक गडचिरोली वनसंरक्षक कार्यालयावर धडकले

140

– रानटी हत्तींने पिकाचे नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी

– जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात रानटी हत्तींनी हैदोस माजवून अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासाडी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून मोठे नुकसान झालेले आहे. तसेच रानटी हत्तींनी मरेगाव येथील शेतकऱ्याचा जीव घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव नुकसान भरपाई देण्यात यावी आणि मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीच्या अनुषंगाने 30 नोव्हेंबर रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक देऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिल्यानंतर निवेदन सादर करून रानटी हत्तीच्या हल्ल्याच्या जीव गेलेल्या मृतकांच्या कुटुंबियांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी रेटून धरली.

यावेळी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले की, गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गाव परिसरात रानटी हत्तींनी धुमाकुळ घातला. ऐन धान कापणी व मळणीचे काम सुरू असताना रानटी हत्तींनी धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. रानटी हत्ती एवढ्यावरच न थांबता, २५ नोव्हेंबर रोजी धान पिकाचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या मरेगाव येथील शेतकरी मनोज प्रभाकर येरमे यांना रानटी हत्तीने चिरडून ठार केल्याची गंभीर घटना घडली. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे जनक्षोभ उसळला असून वनविभागाप्रती संतापाची लाट उसळली आहे

गडचिरोली जिल्हा उद्योग विरहीत असून जिल्ह्यातील प्रमुख पिक धान आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. या भागातील शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी बॅंका व इतर माध्यमातून कर्ज घेऊन खरीप हंगामात धानाची लागवड केली. धान पिकाची कापणी व मळणी करून धान घरी आणण्याचे स्वप्न शेतकऱ्यांनी उराशी बाळगले होते. परंतु रानटी हत्तींनी शेतात धुडगूस घालून धान पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सोन्यासारखे धान पिक हातात येण्यापुर्वीच रानटी हत्तींनी नेस्तनाभूत केल्याने कुटुंबांचा प्रपंच कसा भागवावा, बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, या चिंतेत नुकसानग्रस्त शेतकरी सापडले आहेत.

मरेगाव येथील मृत शेतकरी मनोज प्रभाकर येरमे कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी, वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठोस उपायोजना कराव्यात, कुठल्याही जाचक अटी न लादता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट किमान ५० हजाराची आर्थिक मदत करण्यात यावी, वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठोस उपायोजना कराव्यात, आदी मागण्या रेटून धरण्यात आल्या. यावेळी प्रशासनाने निवेदन स्विकारून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना (उबाठा) चे यादवजी लोहंबरे, संदीप आलबनकर, अमित बानबले, संदिप भुरसे, सुरज उईके, दिपक लाडे, दिलीप वेलादी, दयाराम चापडे, विनोद खेवले, ज्ञानेश्वर सुरकर, राजेंद्र चनेकार, महादेव हजारे, मयुर भोयर, महेश राजुरकर, संजय यम्पलवार, चुडाराम मुनघाटे, महेश बानबले, अजय कोटगले, नागेश धारणे, दादाजी मुनघाटे, प्रफुल डोईजड, भाष्कर सुरकर, अंबादास मुनघाटे, प्रशांत ठाकूर, अनिकेत मुनघाटे, दिपक लाडे, नयन भोयर, राहुल सावरकर, यशवंत भोयर, कैलास लाडे, सचिन सेलोटे, राहुल मडावी, सुरज वलादी, सुधीर बावणे, लोकेश गिरोले, हेमराज अमरापूरे, भैय्याजी फुलझेले, बाळू हर्षे, निकेश हर्षे, कुणाल आवारी, मुकूंदा कोडाप, अभिषेक म्हशाखेत्री, आदित्य सेलोकर, देवाजी कोसमसिले, महेश खेडेकर यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!