Home गडचिरोली टेंभा येथील नाटकाचे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

टेंभा येथील नाटकाचे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

131

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील टेंभा येथे जयहो युवा नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने ‘दु:ख एक यातना’ या नाटकाचे आयोजन 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या नाटकाचे उद्‌घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षभर बळीराजा शेतात राबतो. त्यामुळे शेतीची मळणी होताच ग्रामीण भागातील जनतेच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच्याच एक भाग म्हणून टेंभा येथे नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

या नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी यादवजी लोहबरे, अमित बानबले, दिलीप चनेकार, संजय बोबाटे, अंबादास मुनघाटे, प्रशांत ठाकूर, राहुल सोरते, निरंजन लोहंबरे, जगन चापडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोगरकर, विलास नैताम, दिलीप वलादे, अमित ऊईके, कवळूजी धंदरे, राहुल मडावी, जितेंद्र दोडके, शिवशंकर कुमरे, प्रमोद मेश्राम, शिवासान ढवळे, प्रेम धाकडे, घनश्याम लाकडे, कालिदास वट्टी, नरेश मेश्राम, भास्कर मेश्राम, मनोहर लाकडे, श्रीकांत सेवारे, मुखरू वट्टी, आकाश रंधये, बंडू दोडके, मंगेश पिठाले, आशिष उईके, गणेश ठाकरे, सोमनाथ समर्थ, रेवनाथ ठाकरे, प्रविण म्हस्के, शुभम समर्थ, खुशाल वाकडे, भोलेश समर्थ, अनिल करकाडे, रुपेश चनेकर आदी शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!