Home गडचिरोली भागवत परंपरेच्या माध्यमातून युवकांमध्ये सतगुणांचा प्रसार : ॲड. विश्वजीत कोवासे

भागवत परंपरेच्या माध्यमातून युवकांमध्ये सतगुणांचा प्रसार : ॲड. विश्वजीत कोवासे

104

– अडपल्ली येथे भागवत सप्ताहाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ज्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा विस्तार झाला तितक्याच गतीने त्याचे दुष्परिणाम होतांना दिसतो आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे युवक भरकटलेला असून त्याला योग्य मार्ग दाखवण्याचा काम अशा प्रकारच्या प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतो. देशाचा शास्वत विकास साधायचा असेल व गावचा विकास करायचा असेल तर सदविचार आणि विवेकबुद्धींने विचार करणाऱ्या युवकांची फळी तयार करणे गरज आहे. आज सत्तेत बसलेल्या नेत्यांनी मतविभाजन करुन त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या हेतूने जाती-जातीमध्ये द्वेश भावना तसेच आरक्षण सारख्या संवेदनशील मुद्याला घेऊन राजकारण करू पाहत आहेत. अश्या असामाजिक आणि विभाजनकरी विचारसरनीला हद्दपार करायचा असेल तर युवकांनी पुढाकार घेऊन त्याचा विरोध आपल्या संविधानिक अधिकाराचा वापर करून मतदानाच्या माध्यमातून करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. विश्वजीत कोवासे यांनी केले.

गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, मंडळाचे प्रमुख रुपेश चौधरी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!