Home चंद्रपूर आरक्षणावर बोलण्याआधी शासनाने सर्वप्रथम जातीय जनगणना करावी : डॉ. नामदेव किरसान

आरक्षणावर बोलण्याआधी शासनाने सर्वप्रथम जातीय जनगणना करावी : डॉ. नामदेव किरसान

117

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : केंद्र सरकार जनगणना करीत नसल्याबद्दल खेद व्यक्त करतानाच ओबीसींची सुद्धा जात निहाय जनगणना झाली पाहिजे. त्याशिवाय खऱ्याअर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. योग्य प्रतिनिधित्वासाठी याची आवश्यकता आहे. तसेच आरक्षणावर लादलेली 50 % ची मर्यादा संसदेत कायदा करून हटविल्याशिवाय समाजातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व देता येणार नाही. ही मर्यादा न हटविताच राज्य सरकार मराठ्यांना तसेच धनगरांना सुद्धा आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे जे चुकीचे आहे. हा जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार असून शासनाद्वारे तरी असे करणे घातक आहे. करिता शासनाने जाती-जाती तेल निर्माण करण्याचे काम करू नये, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली=चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी केले.

सावली तालुक्यातील मेहा येथे 20 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित नाट्यप्रयोगाच्या उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी बांधकाम सभापती दिनेशजी चिटनूरवार, राजूभाऊ सिद्धम, सरपंच रुपेश रामटेके, गडचिरोली काँग्रेस अ. जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन विभाग जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसंत राऊत यांच्यासह गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!