Home गडचिरोली खेळाडूंनी खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे : आमदार कृष्णाजी गजबे

खेळाडूंनी खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे : आमदार कृष्णाजी गजबे

163

– 42 व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2023 चे आ. गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ ऑक्टोबर : प्रत्येक मुलाने खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. दिवसेंदिवस खेळाकडील लक्ष दुर्लक्षित होत चालले आहे. आजचा युवा वर्ग खेळासाठी उत्सुक नसून तो मोबाईलमध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे आपला शरीर आपल्याला साथ देत नाही. त्यामुळे प्रत्येकाने खेळाडूवृत्ती जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.

द महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने तालुका क्रीडा संकुल वडसा (देसाईगंज) येथे 42 व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार गजबे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नागराध्यक्षा शालूताई दंडवते, देसाईगंज शहर अध्यक्ष सचिन खरकाटे, तालुका अध्यक्ष (ग्रामीण) सुनील पारधी, आमगावचे माजी उपसरपंच योगेश नागतोडे, प्रतिष्ठित व्यापारी सतपाल नागदेवे, देसाईगंजचे तहसीलदार गेडाम, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी. के. पटेल, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे कार्याध्यक्ष डी. एस. गोसावी, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे महासचिव अतुल इंगळे, स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू व शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!