Home गडचिरोली हैद्राबाद येथील कार्यशाळेला खा. अशोक नेते यांची उपस्थिती

हैद्राबाद येथील कार्यशाळेला खा. अशोक नेते यांची उपस्थिती

129

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तेलगांना राज्यात विधानसभा निवडणूक संबंधित भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन भाजपा कार्यालय हैद्राबाद येथे करण्यात आले. या कार्यशाळा प्रशिक्षण शिबिराला भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्याकडे तेलगांना राज्यातील निरमल जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून खानपूर, निरमल, मुधोली या क्षेत्राची महत्वाची जबाबदारी देण्यात आली.

या प्रशिक्षण शिबिराला प्रामुख्याने भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्यासह राष्ट्रीय संघटन महामंत्री बि. एल. संतोषजी, तेलगांना प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री किसनजी रेड्डी, प्रकाशजी जावडेकर, प्रविणजी दरेकर, डि. के. अरुणाजी, तसेच अन्य मंत्री महोदय व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!