रामृष्णपूर येथील मा. मा. तलावाचे मत्स्य व्यवसायासाठी लिलाव करू नये : नगरसेवक आशीष पिपरे

25

– तहसीलदारांना निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : तालुक्यातील ग्रामपंचायत बहादुरपूर अंतर्गत रामकृष्णपूर येथे असलेल्या मा. मा. तलावाचा लिलाव स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आजपर्यंत महसूल विभागाने मत्स्य व्यवसायाकरिता केला नाही. परंतु नवीन तहसीलदार घोरुडे यांनी नुकताच महसूल विभागाच्या वतीने पुढील पाच तारखेला या तलावाचे लिलाव काढलेला आहे. याबाबत रामकृष्णपूर येथील सरपंच रतन मंडल, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत माल व गावकरी बांधव यांनी नगर पंचायत चामोर्षी चामोर्शी येथील नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांच्या मार्फत तहसीलदार घारुडे यांना निवेदन दिले.

यावर्षी गावकऱ्यांनी स्वखर्चाने तलावात मत्स्य बीज टाकले आहे व मत्स्य संवर्धन करण्यासाठी भरपूर निधी खर्च केला आहे. यावर्षी या तलावाचा लिलाव केल्यास गावकऱ्यांचा खूप मोठा खर्च वाया जाणार आहे. त्यामुळे सदर तलावाचे लिलाव यावर्षी रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली व सदर निवेदन गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा देण्यात आला. यावेळी प्रामुख्याने बाजार समिती माजी सभापती त्रीयुगी महाराज दुबे, सेवा सहकारी संस्था संचालक अशोक धोडरे, बंडू नैताम, रमेश अधिकारी व रामकृष्णपूर येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.