कलश यात्रा काढून गोळा केले मुठभर माती व तांदूळ

65

– नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये श्रमदान मोहीम सुरू

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवरगाव, राजोली, येरंडी व मुरानटोला या चार गावांमध्ये २६ सप्टेंबर रोजी कलश यात्रा काढण्यात आली आणि प्रत्येक कुटुंबाकडून मुठभर माती तसेच भूमिहीन कुटुंबाकडून मुठभर तांदूळ गोळा करण्यात आले.

या कलश यात्रेमध्ये आदिवासी गोंडी वाद्य व दिंडी काढण्यात आली. या कलश यात्रेत ग्रामपंचायत सरपंच रंजनाताई सिडाम, उपसरपंच लक्ष्मी कोवा, ग्राम सचिव खुशाल नेवारे, ग्रामपंचायत सदस्य कपिल कोवा, बिसन हलामी, रुपाली कोरचा, रेश्मिला मडावी, महागु वाडगुरे, मनोहर गुरनुले, नाजुकराव नरोटे, मादगु गावळे, एरंडी येथील पोलीस पाटील वासुदेव कुमोटी, राजोली येथील पोलीस पाटील वनस्कर, ग्रामरोजगार सेवक लोमेश कोकोडे, मोबीलायझर रंजना नरोटे, भुम्या झिटू कोवा, नाजुकराव पदा याच्यासह सर्व शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

कलश यात्रेला चारही गावातील ग्रामस्थ, महिला बचतगट सदस्य, युवक, युवती, महिला मंडळ आदींनी सहकार्य केले. तसेच २७ सप्टेंबर रोजी गावात श्रमदान मोहीम सुरू करण्यात आली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पर्यंत राबविण्यात येणार आहे.