झाडीपट्टीतील कवी, साहित्यिकांचा संमेलन व सत्कार सोहळा थाटात

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २२ सप्टेंबर : झाडीपट्टीतील कवी, साहित्यिकांचा संमेलन व सत्कार सोहळा स्थानिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुनील चडगुलवार तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश एड. दिलीपदादा म्हस्के, झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे उपाध्यक्ष प्रा. तुळशीराम धानोरकर, झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे पदाधिकारी प्रा. पुरुषोत्तम ठाकरे, डॉ. प्रवीण किलनाके, गडचिरोली नगर परिषदेच्या माजी आरोग्य सभापती वर्षाताई शेडमाके आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात झाडीपट्टीतील कवी व साहित्यिक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती एड. संजय ठाकरे यांचा श्री. स्व. संभाजी होकम शिक्षणाधिकारी, कवी, साहित्यिक, नाट्य लेखक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, चुडाराम बल्लारपुरे नाट्य लेखक, कवी यांचा श्री. स्व. मधुकरराव जम्बेवार कवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, वसंतराव कुलसंगे कवी, साहित्यिक यांचा श्री. स्व. सोमाजी कोडाप व्हायोलीन व बासरी वादक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, सौ. मालती भास्कर शेमले शिक्षिका व कवयित्री यांचा स्व. रमाताई मुक्तावरम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, सौ. संगीता ठलाल कवयित्री यांचा श्री. स्व. सागर किसनजी पिठाले नाट्य कलाकार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाल, श्रीफळ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी समाजाला दिशा देणारे मार्गदर्शन केले व सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र हरित सेनेचे भरभरून कौतुक केले.

या संमेलनामध्ये निसर्ग कविता भावस्पर्शी समाज जागृती विषयी अनेक प्रबोधनात्मक उत्कृष्ट अशा कविता सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक महाराष्ट्र हरित सेना गडचिरोलीचे सदस्य सुखदेव शेडमाके यांनी  तर संचालन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मुक्तावरम यांनी केले. समारोपीय भाषण सामाजिक कार्यकर्ते रवींद्र टिंगुसले यांनी तर आभार दहिकर यांनी मानले.