जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ओबीसी संघटनांचा मोर्चा

47

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि विविध ओबीसी संघटनांच्या वतीने 17 सप्टेंबर 2023 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, SC, ST, OBC च्या आरक्षणाची 50 % टक्क्याची मर्यादा हटवून ज्यांची जेवढी संख्या असेल तेवढे टक्के आरक्षण देण्यात यावे, मराठ्यांचा समावेश ओबीसीच्या यादीत करू नये व मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा विविध मागणयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

सदर मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार अभिजीत वंजारी, डॉ. सचिन राजूरकर यांनी केले. सदर मोर्चात विशेष करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय पाटील गावंडे, सावली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, दिनेश पाटील चिटनूरवार, दिनेश चोखारे, विजय नळे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बंधू भगिनी सहभागी झाले होते.