6 लाखांचे बक्षीस असलेल्या तीन जहाल माओवाद्यांना अटक

65

– गडचिरोली पोलीस दलाची कारवाई

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 10 सप्टेंबर : उपविभाग भामरागड हद्दीतील पोलीस मदत केंद्र ताडगाव जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना 2 तर पोस्टे भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात 1 अशा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या तीन जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

7 सप्टेंबर 2023 रोजी मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे उपविभाग भामरागड हद्दीतील पोलीस मदत केंद्र ताडगाव जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 14/23 कलम 435, 395, 324, 143, 148, 149, 120 (ब), 341, 506, 407 भादंवी सहकलम 5/28 भाहका, सहकलम 135 महा.पो.का मध्ये पाहिजे असलेले जहाल माओवादी सरजु ऊर्फ छोटु बंडु महाका (वय 28 वर्ष) मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी (वय 23 वर्ष) दोघेही रा. हलवेर, ता. भामरागड, जि. गडचिरोली यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्रामध्ये 28/02/2023 रोजी विसामुंडीजवळ विसामुंडीला जोडणाऱ्या पुलावर काम करणाऱ्याया ठेकेदाराचा मिक्सर व जेसीबी जाळला होता. माओवादी सरजु हा सन 2010 मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2018 पर्यंत कार्यरत होता. त्याचा रेंगेवाही चकमक, नारगुंडा चकमक (2011), कुंजेमर्का चकमक व मर्दहुर चकमक (2017) अशा 4 चकमक तर घोटपाडी व पेनगुंडा येथील 2 निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता. तसेच माओवादी मधु हा सन 2015 मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन सन 2017 पर्यंत कार्यरत होता. त्याचा मुत्तेमकुही चकमक, दरबा चकमक (2017), कुंडुम चकमक (2016) अशा एकुण 3 चकमक व गोंगवाडा व घोटपाडी येथील 2 निरपराध व्यक्तींच्या खुनात सहभाग होता.

यासोबतच काल 9 सप्टेंबर 2023 रोजी उपविभाग भामरागड येथील पोमके नारगुंडा व पोस्टे भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात जहाल माओवादी अशोक लाला तलांडी (वय 30 वर्ष), रा. पासेवाडा, ता. कुडरु, जि. बिजापुर (छ.ग.) हा लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या पोमकें नारगुंडा पोलीस पार्टी, डी-37 बटा. सिआरपीएफ व विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. तो सन 2017 मध्ये छत्तीसगड येथील सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला व त्यानंतर मागील 02 वर्षापासुन स्वत:चे घरी राहुन माओवादी चळवळीमध्ये अधूनमधुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कार्यरत होता. तसेच 30/04/2023 रोजी केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. या चकमकीमध्ये 3 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. तसेच पोस्टे भामरागड येथे अप. क्र. 37/23 अन्वये यासंदर्भाने गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. यासोबतच सन 2018 मध्ये गोरटुल ते बडाकोक्केर जाणाऱ्या रस्त्यावर व चेरपल्ली ते एटापल्ली जाणाऱ्या बैलगाडी रस्त्यावर बॉम्ब लावण्यात तसेच गोरटुल येथील 1 निष्पाप व्यक्तीच्या खुनात त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने या तिन्ही माओवाद्यांवर प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलीस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात.

70 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 70 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितिन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.