माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

50

– रामंजपूर वासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ सप्टेंबर : सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट रामंजपूर येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

रामंजपूर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मागील अनेक दिवसांपासून गावात नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची त्यांची मागणी होती. माजी जि. प. अध्यक्ष भाग्याश्री आत्राम यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातून सदर गावाला नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिले. नुकतेच या कामाचे भूमिपूजन भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले असून आता गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा मिळणार असल्याने गावकऱ्यांनी आभार मानले.

पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, सरपंच मधुकर आत्राम, उपसरपंच नागराज गणपतीवार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नगरसेवक रंजित गागापूरवार, रवी सुलतान तसेच रामंजपूर येथील नागरिक उपस्थित होते.