दहीहंडीचा हा खेळ खेळाडूंनी जोखीमदारीने व सावधगिरीने खेळावे : खा. अशोक नेते

130

– अभिनव लॉन गडचिरोली येथे दहीहंडी उत्सव उत्साहात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ सप्टेंबर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठया उत्साहाने, आनंदाने, बालगोपाल युवक वर्ग मोठया संख्येने सहभागी होऊन दहीहंडी हा उत्सव साजरा करतात. पण दहीहंडी उत्सवाचा खेळ हा इतर खेळांपेक्षा हा वेगळा खेळ आहे. एकमेकांच्या सहाय्याने खेळ खेळला जातो. हा खेळ खेळतांना पाण्याचा वर्षाव केला जातो. त्यामुळे जोखमीचा खेळ आहे. यासाठी सावधगिरीने खेळ खेळावे. या खेळात खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात इजा व दुखापत सुद्धा होते. याकरिता मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जखमींना दहा लक्ष रुपयांचा विमा कवचची घोषणा केलेली आहे. तरीपण दहीहंडी हा खेळ खेळताना खेळाडूंनी जोखीमदारी, सावधगिरी बाळगावी, असे प्रतिपादन खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी केले.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल नगर गडचिरोलीच्या वतीने दहीहंडी उत्सव अभिनव लॉन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला, त्याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलत होते. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सामाजिक नेते रामायणजी खटी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, गडचिरोलीचे ठानेदार अरुणजी फेगडे, भाजपाचे जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, उपाध्यक्ष भारत खटी, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नितेश खडसे, अनिल तिडके तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने युवकवर्ग, बालगोपाल उपस्थित होते.