विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सहपरिवार भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत त्यांच्यासोबत पत्नी अर्चना, मुली अक्षिता आणि अशिता तथा मुलगा अर्णव उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुलींना शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलींनी सक्षम होऊन भविष्यातील जबाबदाऱ्या स्वीकारत देशासाठी योगदान द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. देशातच नाही तर जगात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना भेटून खूप आनंद झाल्याची भावना यावेळी अक्षिता आणि अशिता नेते यांनी व्यक्त केली.