डॉ. नामदेवराव किरसान यांची गडचिरोली – चिमूर लोकसभा समन्वयकपदी नियुक्ती

22

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ ऑगस्ट : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक 2024 च्या कामाला लागले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने राज्यातील 48 ही लोकसभा क्षेत्राकरिता निरीक्षक आणि समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार नितीन राऊत तर समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक आणि समन्व्यकाच्या नियुक्तीसोबतच काँग्रेसने आता लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.