काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी रोकडे परिवारास केली आर्थिक मदत

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ४ ऑगस्ट : विवेकानंदनगर येथील वृद्ध महिला पुष्पाबाई शामराव रोकडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे काँग्रेसचे गडचिरोली शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना आर्थिक मदत केली.

स्थानिक विवेकानंदनगर येथील वृद्ध महिला पुष्पाबाई शामराव रोकडे ही मागील एक वर्षापासून आजारी असल्याने 30 जुलै 2023 रोजी निधन झाले. त्या मृतक महिलेच्या कुटुंबात पती शामराव रोकडे, एक मुलगा, एक मुलगी व जावई असा परिवार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे पुष्पाबाई रोकडे ह्या रोजीरोटी करत होत्या. दरम्यान अचानक त्या आजारी पडल्या व त्यांचे निधन झाले. त्यांचे पती मुरमुरे विकून आपला उदरनिर्वाह करीत होते. मात्र पुष्पाबाईच्या निधनाने रोकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे नेहमीच गोरगरिबांना आर्थिक मदत करणारे व गरिबांच्या मदतीला धावून जाणारे विवेकानंदनगर येथील काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी रोकडे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत केली.

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते मिलिंद बारसागडे, आनंदरावजी दरडमारे, पुरुषोत्तम सिडाम, विनायक चिचघरे, वसंता सातपुते, राजूभाऊ भारती, जीवनदास मेश्राम, बेबीताई कुंभरे, अनिता डोईजड, वैशालीताई सातपुते, रोहित चंदावार, अमोल पगारे, गोलू सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.