राकाँच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अतुल गण्यारपवार यांचे गडचिरोलीत स्वागत

10

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. या नियुक्तीनंतर गण्यारपवार यांचे गडचिरोली शहरात आगमन झाल्याच्या निमित्ताने स्थानिक इंदिरा गांधी चौकात गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभापती तथा राकाँचे शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

गडचिरोली शहरात आगमन होताच ढोलताशांच्या गजरात आतषबाजी करून गण्यारपवार यांचे स्वागत करून शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, घोट भातगिरणीचे अध्यक्ष करण गण्यारपवार, माजी जि.प. सदस्य राजू आत्राम, नईम शेख, विजय धकाते, युवा शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, भास्कर निमजे, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, महिला तालुकाध्यक्षा नीता बोबाटे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सुनील कत्रोजवार, सुनील चिमुरकर, प्रफुल्ल लोणारे, संजय मेश्राम, राजू डांगेवार, संतोष जुमनाके, मल्लया कालवा, निलेश कोटगले, शेखर मडावी, दिवाकर उंदीरवाडे, मुरलीधर मेश्राम, नरेश कंदिकुरवार, बंडू एलावार, विनोद शेंगर, मधुकर चिंतलवार, भोवरे पाटील, कबीर आभारे, आरती कोल्हे, कल्पना ईप्पावार, बेबी लभाने, प्रतिमा सोरते, माया आक्केवार, सुनीता मेश्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.